शहरातील जुनी वस्ती येथिल मल्हारी मार्तंड खंडोबा मंदिरात गैरव्यवहार प्रकरणी ७ जणा विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

क्राइम

प्रतिनिधी सचिन वाघे (हिंगणघाट )

हिंगणघाट :- जुन्या वस्तीतील डंकीन रोड येथील मल्हारी मार्तंड खंडोबा मंदिरात ७ जणांनी गैरव्यवहार करुन स्वताचा फायदा करून घोटाळा केल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात मल्हारी मार्तंड खंडोबा) मंदिर (कोशाध्यक्ष ) रोहित चंद्रकांत बिडकर वय 38 वर्षे राहणार हिंगणघाट यांनी दिली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेखाबाई सुभाष बिडकर , अभिजित सुभाष बिडकर , अमोल सुभाष बिडकर तिन्ही राहणार नेहरू वार्ड कारंजा चौक हिंगणघाट, विजया निलय गुलालकरी रा. 47 अप्पु कॉलनी, राठी नगर शेगाव नाका अमरावती, ,वैशाली अजीत गांधी रा. फलॅट नं 303 के के एमरलॅन्ड प्लॉट नं 163 नवी मुंबई , अर्चना शशांक पोफळे रा. अणु कॉलनी राठी नगर शेगाव नाका अमरावती,अस्मिता संजय बाफणा रा. चिकु वाडी रो हाउस सुरत राज्य गुजरात यांनी श्री मल्हारी मार्तंड (खंडोबाचे) मंदिर जुनी वस्ती हिंगणघाट येथील मंदिराचे मिळकतीमध्ये दिनांक 03/03/1990 ते 07/07/2021 चे 10/00 ते 12/00 वा दरम्यान गैरव्यवहार करून स्वताचा फायदा करून मंदिराचा कारभार घोटाळा केल्याबददल त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणेबाबत रोहित चंद्रकांत बिडकर वय 38 वर्षे धंदा श्री. मल्हारी मार्तंड (खंडोबाचे) मंदिर, कारंजा चौक नेहरू वार्ड हिंगणघाट (कोषाध्यक्ष ) यांनी केला असुन अर्जामध्ये मा. न्यायालयाचे ओ एम सी आदेश क. 359/23 कलम 56 (3) अन्वये तपास करण्याचा आदेश प्राप्त झाल्याने पो. स्टे. हिंगणघाट येथे अप. क. 302/2024 कलम 417,420,425,463,467,471,406,34 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

CLICK TO SHARE