जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांचे दुर्लक्ष नगर पालिका,भूमी अभिलेख,पोलीस विभाग अधिकारी यांनी केला पदाचा दुरउपयोग माहिती अधिकारात झाले उघड

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट :- तेलंग पेट्रोल पंप जवळील विजय गुणवंत वंजारे याने नगर पालिकेत दी.13 मार्च 2023 ला माझ्या प्लॉट समोरील सर्विस रस्त्यावर असलेल्या रोडवरील अतिक्रमण काढण्या बद्दल अर्ज केला. दी.25 मार्च ला विक्की कोटेवार व इतर यांना अतिक्रमण काढण्या बद्दल नोटीस दिले .दी.6 एप्रिल ला जेसीबी, टिप्पर, क्रेन मशीन घटना स्थळी आली नगर पालिका कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये अतिक्रमण काडले . विक्की कोटेवार याने अतिक्रमण नंतर काडतो असे सांगितले. अतिक्रमण हे नियमानुसार काडले नाही असे लक्षात आले.अतिक्रमण काडण्याबाबत मुख्याधिकारी यांचा आदेश नाही.या जागेवर विक्की शाहू याने नियमात नसतांनाही नगर पालिका अतिक्रमण अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये जेसीबी, टिप्पर, क्रेन मशीन लावून अतिक्रमण काडले, नळाची पाईपलाईन सुद्धा फोडली,नगर पालिका संपत्तीचे नुकसान केले उन्हाळ्यात प्रभागातील लोकांना3 दिवस पाणी मिळाले नाही. या ठिकाणी नगर पालिका संप्पती चे नुकसान केले नगर पालिका अधिकारी यांनी कार्यवाही का केली नाही?दी.28 फेब्रुवारी 2024 ला माहिती अधिकारात दि. 06.04. 2023 रोजी मौक्यावरील 11 अतिक्रमण धारकां पैकी 10 अतिक्रमण धारकांनी स्वतःहा अतिक्रमण काढले विक्की कोटेवार यांनी दोन दिवसाची अवधी मागितली होती. दिनांक 06.04.2023 रोजी अतिक्रमण काढण्यासाठी कोणताही खर्च आलेला नसल्याने सदर माहिती निरंक समजण्यात यावी.माहिती अधिकारात दिलेली माहिती वरून हे सिद्ध झाले की जेसीबी, क्रेन मशीन, टिप्पर हे प्लॉट मालक व विक्की शाहु यांनी स्वतः आणले होते. जागेवर नगर पालिका यांच्या उपस्थिती मध्ये अतिक्रमण काडायला सुरवात केली. नगर पालिके कडुन अतिक्रमण काडले असे चित्र निर्माण केले दुकान दारा कडुन आम्ही स्वतः अतिक्रमण काडले असे लिहुन घेतले हे सत्य आहे.त्या बद्दल चे व्हिडीओ पुरावे आहे.या वरून हिंगणघाट अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग केला लक्षात येते. इतकेच नाही तर,विक्की कोटेवार याच्या दुकानासमोर जबरदस्तीने तारेचे कुंपण केले.या प्रकरणात अतिक्रमण विभाग अधिकारी याच्या सोबत विक्की शाहु याने व्यवहार करूण अतिक्रमण काडले हे लक्षात आल्यामुळे जिल्हाधिकारी कडे अतिक्रमण कार्यवाहीची चौकशी करण्याची मागणी विक्की कोटेवार याने केली. तशी बातमी सचिन वाघे याने दी.12 एप्रिल 2023 ला प्रकाशित केली.विक्की कोटेवार हा या तारखेला सकाळी दुकानात गेला असता त्याने दुकाना समोर विक्की शाहू याने ताराचे कुंपण केले होते त्याचा व्हिडीओ करत असतांना विक्की शाहु हा दुकानात आला व जागेवरून वाद केला या ठिकाणी विक्की कोटेवार याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, इतकेच नाही तर एका अधिकारी याला अशील शिवीगाळ केली त्याचा व्हिडीओ पुरावा आहे. विक्की शाहू विरोधात दी.12 एप्रिल 2023 ला सकाळी 11 -12 च्या दरम्यान सबंधित तक्रार पोलीस स्टेशन येथे विक्की शाहू विरोधात केली पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला. परत याच ठिकाणी रात्री 8 च्या दरम्यान परत विक्की शाहु याने विक्की कोटेवार सोबत वाद केला विक्की कोटेवार याने 112 वर फोन करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी विक्की शाहू व विकी कोटेवार याला पोलीस स्टेशन येथे बोलावले. या ठिकाणी ठाणेदार कैलास पुंडकर यांनी जागे बद्दल कागदपत्र विचारले. विकी शाहू याने 10 लाख रुपये देऊन जागा खरेदी करण्याचा ईसार केला. असे सांगितले. विक्की कोटेवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास विक्की शाहू याला ठाणेदार याने सांगितले. विक्की कोटेवार बाहेर आला. त्याने सचिन वाघे याला माहिती दिली. सचिन वाघे याने परत ठाणेदार यांची भेट घेतली. नगरपालिका व विक्की कोटेवार यांचा वाद आहे विक्की शाहू हा कोण ? विक्की शाहू याने पोलीस स्टेशनला दिलेली माहिती मध्ये व्हिडिओ शूटिंग करायला सचिन वाघे यांनी सांगितले, विक्की कोटेवार व सचिन वाघे याने 50 हजार रुपये मागितले . पोलिसांनी अदाखलपत्र गुन्हा नोंद केला .या प्रकरणात हिंगणघाट पोलीस स्टेशन मधून न्याय मिळणार नाही असे लक्षात आल्यावर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना या प्रकरणात लक्ष देण्यास सांगितले . त्यांनी उपविभागीय अधिकारी दिनेश कदम यांना सांगून दोन्ही पार्टीला बोलावून वाद मिटविला. विक्की कोटेवार याची कागदपत्रे कारवाई सुरूच होती, तिकडे विक्की शाहु याच्या सांगण्या वरून हा प्लॉट विजय वंजारे याने तीरर्थदास मोटवानी याला दी.28 जुलै 2023 ला विकला. विक्की कोटेवार याचे कागदोपत्री व्यवहार सुरूच होते.जिल्हाधिकारी कडे 3 वेळा चौकशीची मागणी केली परंतु उत्तर मिळाले नाही. विक्की कोटेवार याचे अतिक्रमण हिंगणघाट नगर पालिका यांनी अगोदर सर्विस रस्त्यावर सांगितले भूमी अभिलेख क प्रत पुरावा दिला, विक्की शाहु / सोनु आर्या याचा भूमी अभिलेख जमीन बद्दल चे आज पर्यंतचे व्यवहार लक्षात घेता क प्रत बोगस आहे हे मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणुन दिल्यामुळे शेवटी मुख्याधिकारी यांनी राष्ट्रीय राजमार्ग यांना अतिक्रमण काढण्या बद्दल पत्र व्यवहार केला. या ठिकाणी सुद्धा उत्तर विक्की कोटेवार याने उत्तर दिले. विक्की कोटेवार याने हार मानली नाही. भूमी अभिलेख कडुन दी.6 नोव्हेंबर 2023 ला मौका चौकशी होती. विक्की कोटेवार तहसील कार्यलय येथे आल्यावर माहिती मिळाली की दी.6 नोव्हेंबर 2023 ला असलेली मौका चौकशी रद्द केली. व 16 नोव्हेंबर 2023 ला केली याच तारखेला अतिक्रमण मनाई हुकूम अर्ज केला तशी माहिती हिंगणघाट नगर पालिकेला दिली . तरी पण शेवटी हिंगणघाट नगर पालिका व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग यांच्या संयुक्त रीतीने दी. 7 नोव्हेंबर 2023 ला नियमानुसार अतिक्रमण काडले नाही. राष्ट्रीय राजमार्ग हद्दीत विक्की कोठेवार याचे अतिक्रमण आहे मग संयुक्त कार्यवाही कशी असु शकते ? हिंगणघाट नगर पालिका यांनी संयुक्त कार्यवाही मध्ये राष्ट्रीय राजमार्ग यांचा खर्च का नाही ? हिंगणघाट नगर पालिकेकडून पोलीस विभाग कडून बंदोबस्त मध्ये 4981 रुपये भरून 1पोलीस शिपाई व 1 पोलीस हवालदार असा बंदोबस्त असतांना ही या ठिकाणी 9 पोलीस कर्मचारी उपस्थितीत होते. या ठिकाणी उप विभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित हे स्वतः 1 ते 2 तास विक्की शाहु, सोनु आर्या सोबत बाजूलाच असलेल्या चहाच्या दुकानात चहा घेते, चर्चा करीत होते. अशी माहिती मिळाली. तरी सुद्धा विक्की कोटेवार याने हार मानली नाही. पुढे दी.16 नोव्हेंबर 2023 ला मौका चौकशी केली. ती सुद्धा नियमानुसार नाही पुरावा आहे.विक्की कोटेवार याने फेर मौका चौकशी करण्यात यावी अशी मागणी हिंगणघाट भूमी उप अधीक्षक अधिकारी कडे केली आहे. परंतु या कडे अधिकारी यांचे आजही दुर्लक्ष आहे.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाल्यास भूमि अभिलेख व नगरपालिका यांचा भ्रष्टाचार लक्षात येते. दी.28 डिसेंबर 2023 ला विक्की कोटेवार याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून हिंगणघाट पोलीस निरीक्षक अधिकारी यांनी पदाचा दुरुउपयोग करून अपहरनाचा गुन्हा दाखल केला. आज हिंगणघाट येथील सरकारी विभाग,राजकीय पक्ष,पत्रकार संघ यांच्यावर सुद्धा मोठया प्रमाणात विक्की शाहु सोनू आर्याची पकड आहे.माहिती अधिकारात दिलेले उत्तर व असलेले व्हिडीओ पुरावे या वरून विक्की शाहु याने सर्व अधिकारी सोबत व्यवहार केले हे लक्षात येते.या प्रकरणात चौकशी होणार का ? विक्की कोटेवार याचे 15 लाखाचे दुकान बंद असतांना केलेले नुकसान तसेच विक्की शाहु याने दिलेले बयान व पोलीस अधिकारी यांनी खोट्या आरोपात फसविले हे सर्व लक्षात येते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन जनतेला सत्य काय आहे हे दाखविले पाहिजे ?या प्रकरणाकडे हिंगणघाटकरांचे लक्ष लागले आहे.

CLICK TO SHARE