बल्लारपूर नगर परिषदेचा रु.29,53,374/-लक्ष अखेरच्या शिल्लकीचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर

अन्य

सर्वसामान्य जनतेसाठी होमिओपॅथिक आरोग्य केंद्राकरीता विशेष तरतूद

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर नगर परिषदेने नगर पालिका अधिनियम 1965 चे कलम 101 तसेच 101 अ तरतुदी नुसार तयार केलेले सन 2024-25 चे अर्थसंकल्पीय रु 123,87,68,243/- कोटी रुपयाचे अंदाजपत्रक दि.22-02-2024 रोजी न.प. सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करून मा. *श्री. विशाल वाघ* मुख्यधिकारी तथा प्रशासक लेखपाल *श्री राजेश बांगर* व न.प.अधीकारी /कर्मचारी यांचे उपस्थितीत मंजूर करण्यात आले.या अर्थसंकल्पामध्ये बल्लारपूर नगर परिषदेने लोकहिताच्या दूष्टीकोनातुन व विकासाचे दूष्टीने बल्लारपूर शहराचे विकास कामाकरीता प्राधान्य खर्चाच्या प्रमुख बाबी अर्थसंकल्पात नमुद केल्या आहेत यामध्ये दिव्यांगाकरीता 5% निधी रु 25,06,020/- दुर्बल घटकाकरीता 5% 25,06,020 /- महिला व बालकल्याण विकासाकरिता 5% 25,06,020/-शिक्षणाकरीता 5% रमाई आवास योजनेकरीता 81 लाख तरतुद प्रधानमंत्री आवास योजनेकरीता 22 लक्ष तरतूद दलीत वस्ती सुधार योजनेसाठी 10,12 कोटींची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजना व सांडपाणी व्यवस्थापनासाठी (STP) तसेच शहरातील नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा व्हावा यासाठी 11 कोटींची तरतूद. घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सोयीसुविधा व जनजागृतीसाठी 1.35 कोटी ची तरतूद करण्यात आली आहे. बल्लारपूर शहराचा संपूर्ण विकास करण्याकरिता रस्ते , भुमिगत गटारे , चौका चौकाचे सौंदर्याकरण, प्रत्येक वार्डात विदयुत व्यवस्था याबाबत भरीव तरतूद करण्यात आली आहे व बल्लारपूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी होमिओपॅथिक आरोग्य केंद्राकरीता विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. हरीत शहर व स्वच्छ शहर अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे बळकटीकरण,वूक्षरोपन,हरीत पट्टायाचा विकास,होडींग मुक्त शहर याकरिता तरतूद करण्यात आली असून शहरातुन निघणाया सांडपाण्यावर प्रक्रिया करणे करीता मलनिस्सारण प्रकल्प महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत राबविण्यात येणार आहे.तसेच 7 वे वेतन आयोगाकरीता1.79 कोटी तरतूद करण्यात आली अशा प्रकारे बल्लारपूर न.प.ने तयार केलेल्या सन 2024-25 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक *श्री विशाल वाघ* मुख्यधिकारी तथा प्रशासक यांनी विशेष सभेसमोर सादर केले व लेखपाल *श्री राजेश बांगर* यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले.

CLICK TO SHARE