शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील 80 लक्ष रुपयांच्या कामाचे भुमिपूजन

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 80 लक्ष रुपयांच्या निधीतून शासकिय_औद्योगिक_प्रशिक्षण संस्था येथील सिमेंट काँक्रीटच्या रोडचे बांधकाम करण्यात येणार आहे. सदर कामाचे आज भुमिपूजन करण्यात आले. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास केल्या जात आहे. दरम्यान येथील सिमेंट काँक्रीट रोडच्या बांधकामाची मागणी आपल्या कार्यालयाला प्राप्त झाली होती. सदर कामासाठी जिल्हा वार्षीक योजने अंतर्गत 80 लक्ष रुपयांचा निधी देण्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर या कामासाठी 80 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे आज भुमीपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, सेवा निवृत्त प्राचार्य रविंद्र मेहेदंळे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सौ. प्रणाली डहाटे, प्राचार्य आर. बी वानखेडे, बंडोपंत बोढेकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

CLICK TO SHARE