दारोडा टोलनाका जवळ दुचाकी दुभाजकावर जाऊन धडकली एक ठार एक गंभीर जखमी

अन्य

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील दारोडा टोल नाक्याजवळ ३ एप्रिल ला रात्री १० वाजता सुमारास जाम कडून एकुर्लीकडे जात असलेली दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात डोगरखड्डा येथिल गेडाम नामक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर किरण आत्राम राहणार एकुर्ली हा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी तातडीने वडनेर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. मृत्यक व जखमी हे दोघेही दहेगाव येथून लग्न समारंभ आटोपून गावाकडे जात असताना हा अपघात झाला. या घटनेचा पुढिल तपास वडनेर पोलिस करीत आहेत.

CLICK TO SHARE