स्पिड ब्रेकरने घेतला शिक्षिकेचा जिव:विसापूर टोल नाक्यावर घडला अपघात

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर :माॅडेटेरला पेपर देऊन परतिच्या प्रवासात एका शिक्षीकाचा वाहनाचे स्पिड ब्रेकरवर संतुलन बिघडल्याने डोक्याच्या भारावर पडल्याने जखमी होऊन मूत्यू झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी विसापूर टोल नाक्यावर घडली. मूतक शिक्षिका चे नाव बिना भिमराव जीवने (५०) वर्ष आहे.तालुक्यातील कर्मवीर विद्यालय येनबोडी येथील मूदभाषी कर्तव्यदक्ष शिक्षीका दहावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्याने चंद्रपूर येथे माॅडेटेरला देउन आपले काम आटोपल्याचा आनंदात सुटकेचा श्वास सोडत परतिच्या प्रवासाला निघालेल्या.परंतु तो त्यांचा श्वास नियतीने अंतिम ठरला.त्या तेथुन आपल्या पतीसह घरी येत असताना चंद्रपूर- बल्लारपूर रोडवरील विसापूर टोल नाक्या जवळ नवीन स्पीड ब्रेकर बनविले ते त्यांच्या पतीला अंदाज न आल्याने ब्रेकरवरून दुचाकी क्र. एमएच ३४ बीएस ६०७० उसळल्याने त्या डोक्याच्या भारावर पडल्याने त्यांना गंभीर अंतर्गत दुखापत झाली.  सदर अपघाताची घटना ४ एप्रिल रोज गुरूवारला सायंकाळी ७ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या टोल नाका विसापूर येथे घडली. गंभीर दुखापत झालेल्या शिक्षिकेला तात्काळ टोल नाक्याच्या ॲम्बुलन्स ने चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा डॉक्टरला यश आले नाही व ५ एप्रिल रोज शुक्रवारला पहाटे २-३० वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बिना भीमराव जीवने (५०) रा. बामणी ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर असे अपघातात गंभीर जखमी होवून उपचारा दरम्यान मृत पावलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या येनबोडी येथे कर्मवीर विद्यालयात शिक्षिका होत्या. दहावी बोर्डाचे उत्तरपत्रिका तपासून झाल्यामुळे नेवून देण्यासाठी चंद्रपूरला गेल्या होत्या आपल्या डॉक्टर पतीसह सोबत त्या घरी येण्याच्या बेतात असताना परतीच्या प्रवासात असताना टोल नाका जवळील ब्रेकरचा त्यांच्या पतीला दुचाकी चालवत असताना त्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी ब्रेकरवरून उसळल्याने त्या जागीच डोक्याच्या भारावर पडल्या अंतर्गत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले परंतु शर्तीचे उपचार झाल्यावरही त्यांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले नाही. अपघाताचे पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे.टोल नाक्यावर ब्रेकरला पांढऱ्या रंगाचे सुरक्षेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर पेंट, वाहने सावकाश चालवण्याचे सूचना फलक लावण्यात आले. जवळ प्रसाधन गृह असल्याने रस्ते नियमाची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. परंतु वाहने ब्रेकर जवळ वेग नियंत्रित ठेवत नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडत आहे. – दिपक कंचर्लावार, व्यवस्थापक डब्ल्यूसीबीटीआरएल टोल नाका विसापूर

CLICK TO SHARE