नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने जलसेवेचे लोकार्पण

अन्य

प्रतिनीधी: अब्दुल कदीर बख्श

नारायण सेवा मित्र परिवार द्वारा मानव सेवा अंतर्गत भगवान महावीर यांचे जयंती दिनी जलसेवेचे लोकार्पण करण्यात आले. शहरी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची तृष्णा भागविण्यासाठी स्थानिक विनायक चौधरी चौकातील जैन ऑप्टिकल समोर जल प्याऊ लावण्यात आली. शीतल जल प्याऊ चे उद्घाटन प्रा.लितीका बेलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण सेवा मित्र परिवार चे अध्यक्ष महेश अग्रवाल ,महेश दीक्षित, लक्ष्मण दहाके, दामोदर चंदनखेडे, शंकरभाऊ वाकडे, यशवंत गढ़वाल, अरुण पंडित, चंद्रकांत कामडी, पराग मुड़े, दुर्गा प्रसाद यादव, प्रा. किरण वैद्य, सुनील आलोनी, चंद्रकांत रोहणकर, मुनेश्वर जवादे , अमोल भूतड़ा, लक्ष्मीकांत मेढे, निलेश भुतडा, श्रीमती लितीका बेलेकर, विरश्री मुड़े, नंदिनी जवादे, शुभांगी वैद्य, कंचन खींवसरा, कविता खींवसरा आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

CLICK TO SHARE