जागतिक साळी फाऊंडेशन वर्धा जिल्हा टीमचे वतिने चर्चासत्राचे आयोजन

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

दिनांक ४मे रोजी सायंकाळी ५वाजता यात्री निवास आश्रम परिसर बापुकुटी समोर सेवाग्राम येथे जागतिक साळी फाऊंडेशन वर्धा जिल्हाचे वतीने भविष्यातील साळी समाज , महीला सक्षमीकरण , गाव तेथे विकास आणि सामाजिक , शैक्षणिक व आर्थिक विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी विजय नारायण वक्ते संस्थापक जागतिक साळी फाऊंडेशन तथा कक्ष अधिकारी , महसुल व वन विभाग महाराष्ट्र शासन , मंत्रालय मुंबई हे मार्गदर्शन करणार आहे . तसेच विशेष प्रविण्यप्राप्त युवक ,युवतींचा आणि सेवानिवृत्त शासकिय अधिकाऱ्यांचा प्रमूख अतिथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तरी ज्यास्तीत ज्यास्त संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन दत्तात्रय गो. दिवटे वर्धा जिल्हा wsf प्रमूख व जागतिक साळी फाऊंडेशन वर्धा जिल्हा टीमचे वतीने करण्यात आले आहे .

CLICK TO SHARE