केजरीवाल यांना तात्काळ तुरुंगातून मुक्त करा,आप चे उपाध्यक्ष अफजल अलींनी रक्ताने लिहिले राष्ट्रपतींना पत्र

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी मोठ्या षड्यंत्राने तुरुंगात टाकण्यात आले. त्यांची तुरुंगातून तात्काळ मुक्तता करण्यात यावी या मागणीसाठी आप बल्लारपूर चे उपाध्यक्ष सय्यद अफजल अली यांनी आपल्या रक्ताने राष्ट्रपतींना पत्र लिहिले.हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे पाठविण्यात आले. यावेळेस शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, रेखा भोगे, गीताताई इत्यादीं कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE