पाच दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने वृद्धाला पाणी भरण्यासाठी जावे लागले
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : येथील संतोषी माता वॉर्डात नळ न आल्याने हातपंप चालवत असताना अचानक पडून मृत्यू झाला. देवचंद ढोरे ७५ वर्ष असे १ मे सायंकाळी घडलेल्या घटनेतील मृताचे नाव आहे. या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बल्लारपूर शहरात वेकोली, पेपर मिल आणि एफडीसीएम वसाहती वगळता जवळपास संपूर्ण शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. नवीन पाइन लाइन जुन्या पाइपलाइनला जोडण्यासाठी २८ ते ३० एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याची नोटीस प्राधिकरणाने दिली होती, मात्र २७ तारखेपासूनच पाणीपुरवठा बंद करण्यात आला.त्यानंतर ३० एप्रिल पुन्हा मेसेज पाठवून १ मे पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती देण्यात आली.मात्र सलग पाच दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा घाट प्राधिकरणाने आखला असेल तर त्याची पूर्व सुचना नागरीकांना देणे आवश्यक होते. काही टॅकर किंवा अन्य पर्यायी व्यवस्था करावी लागली.मात्र अशी कोणतीही व्यवस्था न केल्याने तमाम शहरवासी ४४ अंश सेल्सिअस तापमानात पाण्याच्या शोधात भटकत होते.तसेच १ मे सायंकाळी देवचंद हे पाणी भरण्यासाठी जवळच्या बोरिंगवर गेले होते.हातपंप चालवत असताना ते अचानक कोसळले आणि त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुरुवारीही अपुरा पाणीपुरवठा झाले.सलग ५ दिवसानंतर २ मे सकाळी नळाला पाणी सोडण्यात आले.मात्र पाण्याचा प्रवाह एवढा कमी होता की लोकांना फक्त पिण्यासाठी पाणी मीळु शकले पाइपलाइनचे काम प्रलंबित या विषयी गजानन बारापात्रे अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बल्लारपूर यांनी सांगितले की पाइपलाइनचे काही काम बाकी आहे.पाच दिवसांपासून पाइपलाइन रिकामी असल्याने नळामध्ये पाणी कमी आले असावे. यासंदर्भात वाॅलमन यांच्याशी बोलून समस्या सोडवली जाईल.आता कोणालाही हातपंप चालवण्याची गरज भासणार नाही.