घरी कोणी नसतांना अज्ञात इसमाने लावली आग आगीत दीड लाखाचे नुकसान

क्राइम

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

दि.०५ मे निवासस्थानी कुणी नसल्याची संधी साधून दृष्ट मानसिकतेच्या अज्ञात आरोपीने फिर्यादीचे निवासस्थानातील गरजू साहित्याची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल शनीवारी संत ज्ञानेश्वर वार्ड परिसरात घडली. संत ज्ञानेश्र्वर वार्ड येथे अमित गोजे यांच्या राहत्या घरी हि घटना घडली असून यात गोजे यांचे जवळ्पास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. अमित जोगे हे छोटे ट्रक व्यवसायी आहेत. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचे घरातून मोठया प्रमाणात आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी गोजे यांना फोनवरुन माहिती दिली, अमित गोजे हे येथे एकटेच राहतात. काल सकाळी काही कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. घटनेची माहिती मिळताच ते आपल्या निवासस्थानी परत आले, या दरम्यान शेजाऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती. घराची पाहणी केली असता ही आग मुद्दाम लावली असल्याचा संशय घरमालक अमित गोजे यांनी व्यक्त केला. आग लावणाऱ्या अज्ञात आरोपीने बेडरूम मधील लाकडी बेड,गाद्या, आंथरून, कपडे, टीवी यांना आग लावीत, घरातील गॅस सिलेंडरपर्यंत आग लागुन मोठा स्फोट व्हावा, या वाईट हेतूने घरातील खिडक्या व दारांचे परदे गॅस सिलिंडरपर्यंत आग पसरावी या दृष्ट हेतूने पसरवून ठेवले. शेजाऱ्यांनी आग विझविण्याचे वेळी गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या प्रभारी ठाणेदार वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री एल.डी.दुर्गे व त्यांचे सहकारी तपास करीत आहे.

CLICK TO SHARE