पोलीस पथकाने केला 24 तासात विहीरीवरील ओलीताची मोटार पंप चोरीचा गुन्हा उघड

क्राइम

सिंधी रेल्वे : पोलीस स्टेशन सिंधी रेल्वे येथे दिनांक 4/6/2024 रोजी फिर्यादी नामे सुनिल राजेन्द्र अवचट रा. काढली यांची नारायणपुर शिवारात भीजा कळमणा गावाचे जवळ असलेल्या शेतातील विहीरीवर ओलीता करीता लावलेली पाण्यातील मोटार पंप 5 एच.पी. ची कोणीतरी अज्ञात आरोपीने दिनांक 3/5/2024 चे रात्रदरम्यान चोरून नेल्याबाबत तक्रार पो.स्टे. ला प्राप्त झाल्याने अपराध क.0138/24 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्हयांत मुखबिरच्या माहीतीच्या आधारावर आरोपी नामे 1) गणेश बंडुजी भोयर वय 30 वर्षे रा. कळमणा ता. समुद्रपुर जिल्हा वर्षा 2) शंकर दिवाकर मुझे वय 27 वर्ष रा. मारडा ता. समुद्रपुर जि. वर्धा यांना अटक करून त्यांचे कडुन गुन्हयांत वापरलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी गाडी क्र. एम.एच. 40/ए.ए. 1945 किंमत अंदाजे 40,000रू ही जप्त करून त्यांनी चोरलेली पाण्यातील मोटार सिंदी रेल्वे गावातील भंगार दुकाणदार शहेजाद हबीब शेख यास विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे कडुन चोरीस गेलेले मोटार पंप किमत 10,500 रू ची जप्त करून गुन्हयांत कलम 34, 411 भा.दं.वि. प्रमाणे वाढ करून तिन्ही आरोपीतांकडुन एकुण 50,500रू चा माल जप्त करून ताब्यात घेण्यात आला.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधिक्षक डॉ सागर कुमार कवडे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मागदर्शनात ठाणेदार देवेंद्र ठाकुर, पोउपनि सुर्यवंशी, पोलीस हवालदार आंनद भस्मे, पोशि रवि मोरे, कांचन चाफले, उमेश खामनकार, मपोशी शिवाणी निकम सर्व नेमणुक पो.स्टे. सिंदी रेल्वे यांनी केली.

CLICK TO SHARE