तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस वर्धा जिल्ह्याचा पारा दोन अंशाने वाढण्याचा इशारा दिला. तसेच ७ ते १० मे पर्यंत जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी पुन्हा विजांच्या कडकडाटासह गारपीट अथवा वादळी पाऊस होण्याचाही इशारा दिला आहे. त्यानुसार येत्या ४८ तासांत जिल्ह्याचा कमाल पारा दोन अंशांनी वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा पारा ४४ अंशाच्या पार जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यानंतर तो खाली येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे पुढील काही दिवस सावधान राहण्याची गरज आहे.