मुजोर रेती तस्करांना अखेर अटक

क्राइम

प्रतिनिधी:शारुखखान पठाण( वरोरा )

वरोरा– अनेक महिण्यापासून गावातील,तसेच वरोरा येथील रेती तस्कर अवैध वाहतूक करीत होते. आमचे पत्रकार, वरोरा येथील पोलीस सुद्धा काही बिघाडू शकत अशी शेखी मिरविणाऱ्या रेती तस्करांना आज 13 मे रोजी सकाळच्या सत्रात चार रेती तस्करांना रेतीची अवैध वाळू वाहतूक करीत असताना स्थानिक गून्हे शाखा, चंद्रपूर यांनी कारवाही करत चार ट्रॅक्टर सहित 24लाख 20हजारच मुद्देमाल जप्त करीत कारवाही केली.महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, चंद्रपूर यांच्या पथकाने दि.13मे रोजी पेट्रोलिंग दरम्यान खबरी ने दिलेल्या माहितीनुसार अनिल अशोक शेंद्रे, वय 30 वर्ष रा. एकर्जूना, प्रवीण शेषराव उरकुडे, रा. करंजी, आशिष यशवंत थेरे,वय 28, एकर्जुना. तुषार भास्कर माथानकर,वय 22, एकार्जूना,या ट्रॅक्टर चालकसहित, अमोल गजानन पारोधे,वय 40एकर्जुणा,वरोरा. सुजित देविदास कष्टी, वय 50, करंजी, जाकिर रसूल शेख, वय 40चिरघर प्लॉट, वरोरा यांच्यावर पोलीस स्टेशन वरोरा येथील अंतर्गत गुन्हा दाखल करी मुद्देमाल प्राप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात विनोद भुरले, पी एस आय, पोलीस हवालदार धनराज करकाडे, स्वामीदास सालेकर ,गजानन नागरे, प्रशांत नागोसे, अजय बागेसर यांनी हि कारवाही यशस्वीरित्या केली.

CLICK TO SHARE