अल्लीपूर येथिल यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रथम

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

काल दिनांक 21 मे बारावीचा निकाल जाहीर झाला यामध्ये यशवंत कनिष्ठ महावि‌द्यालयांमधून बारावी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारी विद्यार्थिनी कु. पायल रत्नाकर कोसळे या विद्यार्थिनी बारावी मध्ये 73% गुण प्राप्त केले तसेच द्वितीय क्रमांक आदित्य मोर्चे आणि तृतीय क्रमांक यशवंत ताकसांडे या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचा संपूर्ण निकाल 83.33% लागलेला आहे. महाविद्यालयाच्या निकालाबद्दल प्राचार्य प्रा. स्मिता ढोकणे तसेच कनिष्ठ महावि‌द्यालयाचे प्राध्यापक प्रा. सोळंके सर, प्रा. रामटेके सर, प्रा. चंदनखेडे मॅडम, प्रा. समर्थ सर यांनी समाधान व्यक्त करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

CLICK TO SHARE