तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे खोटे दस्तऐवज तयार करून मुलाच्या नावे शेती करुन देऊन फसवणूक करणाऱ्या चार जणा विरोधात ३१ मे रोजी सायंकाळी ५. ३० वाजता शोभा शंकर शेंडे यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती आज १ जुन रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदिप शंकर शेंडे, नामदेव झाडे, अमरसिंग मोरे, तिन्ही राहणार वाघोली व दुय्यम निबंधक अधिकारी हिंगणघाट यांनी संगनमत करून पती शंकर शेंडे यांच्या नावाने असलेल्या शेतीचे खोटे दस्तऐवज तयार करून संपूर्ण शेती मुलाच्या नावे करुन दिली.या प्रकरणी हिंगणघाट पोलीस पुढील तपास करीत आहेत