अग्निशमन केंद्र आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांची बैठक

अन्य

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली – नगरपरिषदेत मुख्याधिकारी विशाल वाघ व भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद अग्निशमन केंद्राच्या आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांची बैठक झाली. कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी नियमानुसार त्यांना पूर्ण कार्यकाळाचे थकित वेतन, भविष्य निर्वाह निधी आदी रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिले. जर कंपनीने असे केले नाही, तर तिला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते असे ते यावेळी म्हणाले.

CLICK TO SHARE