बहुप्रतीक्षेनंतर ग्रामस्थांना मिळणार अखंड वीजपुरवठा

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील हडस्ती, न चारवट गावातील नागरिकांना वर्धा, इरई नदीच्या पुराचा च दरवर्षी सामना करावा लागतो. उंचीने कमी असलेले वीज खांब या पुराच्या पाण्यामध्ये आल्यानंतर येथील वीजपुरवठा खंडित केला जात होता. नाइलाजाने नागरिकांना पंधरा पंधरा दिवस काळोखात दिवस काढावे लागत होते. मागील अनेक दशकांपासूनची ही समस्या होती. यासाठी नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान, आता वीज विभागाने उंच खांबाद्वारे गावाला वीजपुरवठा जोडला आहे. व त्यामुळे ग्रामस्थांची समस्या कायम स्वरूपी सुटली आहे.

CLICK TO SHARE