स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाची कारवाई

क्राइम

मोहफुलाची हातभट्टी दारु तयार करणाऱ्या अड्ड्यावर, धाड, किंमती- 73, हजार 800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)

पोलीस अधिक्षक , श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी मावळते वर्षाच्या व येणारे नवीन वर्षाच्या आगमन प्रसंगी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत….. मा. वरिष्ठांचे आदेश निर्देश सूचनाप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर छापे टाकून प्रभावी धाड कारवाईची *ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहीम* राबविण्यात येत आहे….. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री . दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मिळालेल्या खात्रीशिर गोपनीय माहितीच्या आधारे आज दिनांक- 30/12/2023 रोजी किन्ही नाला जंगल शिवार परिसरात अवैधरित्या हातभट्टी दारू गाळण्याची भट्टी लावून मोहफुलाची हातभट्टी दारू अवैधरित्या तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाड कारवाई केली असता असता ईसंम नामे – *1) अशोक सुदाम डहाट वय 50 वर्षे,* *2) राजेशसिंह शिरजोरसिंह जतपेले वय 38 वर्षे दोन्ही राहणार – किन्ही* असे दोघे हा.भ. दारू गाळतांना (सडवां मोहफुल रसायन चा वापर करून हातभट्टी दारू तयार करतांना) मिळून आलेत……. मिळून आलेल्या इसमांचे ताब्यातून गाळलेली हा.भ. दारु, हा.भ.दारू गाळण्याचे साहित्य, रबरी ट्युब, जलावू काड्या, लोखंडी ड्रम, जर्मन घमेले, टिन, सडवा मोहफुल रसायन असा किंमती 73 हजार 800/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.नमूद दोन्ही आरोपी विरुद्ध पो. ठाणे रावणवाडी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई),(ब),(क), (ड),(फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.मा. वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे सदरची धाड कारवाई पोलिस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केलेली आहे.

CLICK TO SHARE