31 डिसेंबर 2023केशोरी पोलीस स्टेशनच्या दारू नको दूध प्या या जनजागृती मोहिमे अंतर्गत जनतेचा,विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अन्य

भव्य प्रभात फेरी संपन्न सुमारे 1000 विद्यार्थ्यांचा सहभाग

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)

तरुण वर्गाने दारू पासून परावृत्त होण्यासाठी केशोरी पोलीस स्टेशनच्या *”दारू नको, दूध प्या”* या जनजागृती मोहिमेला दि. 27/12/2023 पासून सुरुवात झालेली आहे…. या मोहिमेदरम्यान प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना दारूच्या दुष्परिणामाबद्दल माहिती सांगण्यात येत आहे…. या अनुषंगाने आज दि. 31/12/2023 रोजी केशोरी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी नवोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ कनिष्ठ महाविद्यालय, श्री.समर्थ आदिवासी आश्रम शाळा व कनिष्ठ महाविदयालय केशोरी या शाळांमधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन केशोरी गावामधून भव्य प्रभात फेरी काढली….. *या प्रभात फेरी मधून नागरिकांना दारूच्या दुष्परिणामाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन न करता दूध पिऊन करण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाचे वतीने पो. ठाणे केशोरी तर्फे करण्यात आले आहे.* प्रभात फेरीमध्ये केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम, सर्व पोलिस अंमलदार, या तीन शाळांमधील सुमारे 1000 विद्यार्थी व शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…. सदरचा उपक्रम पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया,श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी,श्री. संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ कदम, पोहवा. प्रल्हाद देव्हारे, पोहवा. सुशिल रामटेके, मपोहवा. पुनम हरिणखेडे, मपोना प्रसन्या सुखदेवे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या राबवला आहे.

CLICK TO SHARE