कारवाई देशी दारुचा साठा किंमती- 40, हजार 740/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगांव (गोदिया)
पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, श्री. नित्यानंद झा, यांनी मावळते वर्ष व येणारे नवीन वर्षाच्या आगमन प्रसंगी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश सूचना दिलेल्या आहेत….. मा. वरिष्ठांचे आदेश निर्देशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाईची *ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहीम* राबविण्यात येत आहे….. या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी श्री. संकेत देवळेकर यांनी मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे देवरी उपविभागातील अवैध धंद्यांवर छापे टाकून प्रभावी कारवाई करण्याकरिता विशेष पथक गठीत करून उपविभागातील पो. ठाणे अंतर्गत क्षेत्रातील अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाई करण्यात येत आहे… दिनांक- 31/ 12/ 2023 रोजी विशेष पथकाने गोपनीय माहिती च्या आधारे धाड कारवाई केली असता असता……. *आरोपी इसम नामे – रवींद्र लक्ष्मण बोडगेवार वय 50 वर्षे रा. पालांदुर (जमिदारी) ता. देवरी जि. गोंदिया* याचे राहते घराची अवैधरित्या दारू बाळगून विक्री संबंधाने घरझडती घेतली असता घरझडतीत त्याचे राहते घरी देशी दारू चा साठा 12 नग खरड्याच्या पेट्या ज्यात प्रत्येकी 180 ml नी भरलेले 48 नग पव्वे असे एकूण 576 नग पव्वे किंमती- 40 हजार 320/- रुपयांचा मुद्देमाल अवैधरीत्या विना पास परवाना बाळगतांना मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे… त्याचप्रमाणे ककोडी येथील एका दारु विक्रेत्यावर सुध्दा कारवाई करण्यात आलेली असून दोन्ही कारवाई मिळून 40 हजार 740/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे..आरोपीविरुद्ध पो. ठाणे चिचगड येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ),77(अ) नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत…. त्याचप्रमाणे 31 डिसेंबर चे औचित्य साधून पोलीस ठाणे चिचगड अंतर्गत परिसरातील चिचगड, पालांदुर (जमीदारी), ककोडी येथील जनतेला, युवकांना *दारूचे व्यसन सोडा दुध प्या, खर्रा सोडा, खारीक खा,* असे जनजागृतीपर आवाहन करण्यात आले आहे…… सदरची धाड कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनात आणि नेतृत्वातील विशेष पोलीस पथकाने केलेली आहे.