आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैय्या नवघरे यांच्या संकल्पनेतून राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान मार्फत आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

खेल

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत:विधानसभा मतदार संघाच्या इतिहासातील पहिली वसुमती मॅरेथॉन स्पर्धा सरत्या वर्षाचा निरोप घेताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या संकल्पनेतून राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान मार्फत आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आज दिनांक 31/ 12/ 2023 रोजी सकाळी यशस्वीपणे संपन्न झाली.महिलासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर पाच किलोमीटर ठेवले होते तर पुरुषाकरता दहा किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते.या स्पर्धेला हिरवे झेंडी माननीय माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश जी दांडेगावकर यांनी दाखवली याप्रसंगी तहसीलदार शारदा दळवी मॅडम पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेचे नियोजन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते बाहेरगाव वरून आलेल्या स्पर्धकांची विशेष काळजी घेण्यात आली होती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू भैय्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व अनेक विद्यालयातील शिक्षक वृंद अहोरात्र झटत होते. या स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये प्रथम येण्याचा मान शेगाव जिल्हा बुलढाणा ची प्रणाली शेगोकार दुसरी येण्याचा मान परभणीची अश्विनी जाधव आणि तिसरी येण्याचा मान परभणीच्या ज्योती गवते यांना मिळाला. पुरुषामध्ये पहिला येण्याचा मान चाकूर जिल्हा लातूर येथील निवृत्ती गुडेवार. दुसरा येण्याचा मान नांदेडच्या गोविंद निमडगे आणि तिसरा येण्याचा मान पुसद जिल्हा यवतमाळ येथील रोहित कदम यांना मिळाला.या स्पर्धेमध्ये 200 महिलांनी आपला सहभाग नोंदविला तर 700 पुरुषांनी आपला सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदविला.वसुमती मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या लोकांचे सहकार्य लाभले त्या मध्ये स्वयंसेवक राजू भैया प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिक्षक वृंद पोलीस. नगर पालिका अधिकारी व कर्मचारी आरोग्य विभागातील डॉक्टर्स व कर्मचारी या सर्वांचे माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी आभार मानले. यावर्षी ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात आली होती पुढील वर्षापासून ही स्पर्धा देश पातळीवर आयोजित करण्याचा मानस माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

CLICK TO SHARE