पत्रकार सोनु आर्या याचे अपहरण नसून षडयंत्र होते सी.सी फुटेज वरून झाले सिद्ध

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

दी.19/ 12/2023 झालेला प्रकाराचा सोनु आर्या याने पोलीस स्टेशन ला अपहरण केल्याची स्वतः रिपोर्ट का दिली नाही? सोनु आर्या याने रिपोर्ट न देता दी 28/12/2023 ला विक्की शाहु हा रिपोर्ट देते कारण षडयंत्र रचून पद्धतशीर पणे एकाच दगडात विक्की कोटेवार रहमत पठाण, आसिफ साबुद्दीन या तिघांनी अपहरण केले याची सुपारी विक्की कोटेवार व भारत येणोरकर याने 15 लाखात दिली तर दुसरीकडे 6 लाख रुपये खंडणी पैकी एक लाख रुपये दिल्याचा पुरावा त्या वरून हिंगणघाट पोलीस स्टेशन ला कलम 364-A, ३८५,३८६,120-B,३४ गुन्हा नोंद केला. इतकेच नाहीतर हिंगणघाट पत्रकार संघ याच्या माध्यमातून पत्रकाराचे अपहरण बंदूक दाखवून केले हे सुद्धा सांगण्यात आले. सोनु आर्या व विक्की शाहुहा संघाचा उपयोग घेऊन विक्की कोटेवार व इतरांना खोट्या आरोपात फसविण्याचा डाव सी. सी फुटेज मध्ये झाला उघड. सी फुटेज मध्ये सोनु आर्या हा स्वतः वडनेर येथील खत्री याच्या पेट्रोल पंप वर पेट्रोल भरण्यासाठी ज्या दिवशी अपहरण झाले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद त्या रात्री 11.17 मिनिटांनी गाडी मध्ये समोर बसून असतांना स्वतः उतरत आहे पेट्रोल पंप कोणीही नसल्याने परत गाडीमध्ये स्वतः बसत आहे. या मध्ये कुठेही अपहरण झाल्याचे सिद्ध होत नाही कारण अपहरण करणारा असता तर ज्याचे अपहरण करायचे असते त्याला मधात बसवून ठेवले असते व बाहेर निघू दिले असते का?

CLICK TO SHARE