दुकानाला आग शेजारच्या दोन दुकानाचेही झाले नुकसान

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

तुकूम परिसरात असलेल्या एका इलेक्ट्रिकलच्या दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या आगीमध्ये शेजारील दोन दुकानालाही मोठा फटका बसला. ही घटना घडली. पहाटे तुकूम परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्र जवळ मुक्ताई इलेक्ट्रिकलचे दुकान आहे. दुकान मालक शनिवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. पहाटेच्या सुमारास दुकानाला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करीत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये दुकानात टीव्ही, पंखे असे इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले.

CLICK TO SHARE