रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील शेतकरी अशोक सुपारे यांच्या शेतामध्ये तूरी कापत असताना अचानक तुरीमध्ये असलेल्या रानडुकराने निखिल गोठे वय तीस वर्ष या शेतमजुरावर हल्ला केला त्यात शेतमजूर हा गंभीर जखमी झाला आहे. त्वरित उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रअल्लिपुर येथे मजुरास आणले असता प्राथमिक उपचार करून शेतमजुर निखिल गोठे यास पुढीलउपचारार्थ सावंगी मेघे रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती अल्लीपूर येथील वनरक्षक शिवाजी राठोड यांना देण्यात आली आहे. याघटनेने परिसरात दहशत पसरली असून वनविभागाने शेत मजुराला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहेत

CLICK TO SHARE