चंद्रपूर मेडिकल कॉलेज टेलिकन्सल्टसीने एम्सला जोडणार

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गंभीर आजाराच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी नागपूर किंवा अन्य रुग्णालयात न्यावे लागते. यात वेळ आणि पैसाही खर्च होतो. प्रसंगी रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालये किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजारावर उपचार व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालय आणि चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरातील एम्सला टेलिकन्सलटन्सीने जोडण्यात येईल.

CLICK TO SHARE