करंजी येथे आधारभूत धान खरेदीला सुरुवात

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

करंजी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत नुकतीच शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या आधारभूत धान खरेदी योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. संस्थेअंतर्गत येणाऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक मंडळाच्या मार्फतीने करण्यात आले आहे. शासनाने आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी व त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, याकरिता आधारभूत योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या धानाला २१८३ रुपये भाव मिळणार आहे.

CLICK TO SHARE