रानडुकराने घेतला शेतकऱ्याचा बळी

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

रानडुकराने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर नागेश भाऊराव चौधरी (४२) असे मृताचे नाव आहे. नागेश चौधरी यांनी तेलंगणा सीमेलगत धाबा वनपरिक्षेत्रात सोनापूर येथे. कपाशीच्या शेतात रानडुकरांचा हैदोस सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे चौधरी हे शेतात गेले होते. मात्र घरी परत आले नाहीत शोधाशोध केली असता नागेश चौधरी यांचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. लाठी पोलिस व धाबा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.

CLICK TO SHARE