वसमत येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शौर्यदिन साजरा

अन्य

प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली

हर्ष नगर संबोधि बुद्ध विहार प्रांगणात दिनांक 1 जानेवारी रोजी भारतीय बौद्ध महासभा वसमतच्या वतीने कोरेगाव भीमा येथील शौर्य स्तंभाच्या प्रतिकृती समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण व शौर्य स्तंभाच्या प्रतिकृती पुष्पहार अर्पण मानवंदना व अभिवादन केले या कार्यक्रमास भा. बौ.महासभेचे ता. अध्यक्ष कवी बालाजी मोरे तर मार्गदर्शक म्हणून दौलतराव गजभारे,रघुपती सरोदे माझी वकील संघाचे अध्यक्ष अँड रणधीर तेलगोटे, आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते भीमा कोरेगाव ची लढाई अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात होती माणसाने माणसावर अमानुष अत्याचार करून भेदभाव केला जात होता. शौर्यचे प्रतीक म्हणजे भीमा कोरेगाव होय भीमा कोरेगाव चा स्तंभ आपल्याला आठवण करून देतो तुम्ही लढाऊ आहात तुम्ही स्वाभिमानी आहात शूरवीर आहात त्या प्रसंगी मान्यवरांनी शूरवीरांचा इतिहास सांगून व यापुढे येणाऱ्या संकटासाठी भीमसैनिकांनी एकत्र येऊन लढा देण्याची आजही अशक्त आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावणजी नंद यांनी केले या कार्यक्रमाला पुरभाजी कांबळे खंडोजी पंडित डॉक्टर नामदेव मुळे मेजर भगवान सूर्य तळ यादव चौरे खंदारे साहेब नामदेव इंगोले देवदास शिवभक्त यांच्या बार्टीचे पद अधिकारी सह मान्यवर ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

CLICK TO SHARE