वसमतला गुरुवारी ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन

अन्य

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत येथील डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉ. क्यातमवार यांच्या पुढाकारातून वसमत नांदेड रोडवरील गोशाळेच्या बाजूला असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिनांक 29 डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताह संगीत तुळशीराम कथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन महोत्सव कार्यक्रमास सुरुवात झाली असून वसमत शहरासह ग्रामीण भागातील भाविक भक्तांची या धार्मिक कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त गर्दी होत आहे या अनुषंगाने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या कीर्तनकार मंडळीचे दररोज कीर्तन होत असून दिनांक 4 जानेवारी रोजी याच ठिकाणी सायंकाळी चार ते सहा या वेळेत सुप्रसिद्ध असणारे कीर्तनकार श्री ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून या कीर्तन सोहळ्यास जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा तसेच आज दि 2 जानेवारी रोजी रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत श्री ह.भ.प. गुरुवर्य महादेव महाराज राऊत बिडकर यांचे कीर्तन होणार आहे तसेच उद्या दिनांक 3 जानेवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ श्री ह भ प माऊली महाराज सिंदगीकर यांचे कीर्तन व या सप्ताहची सांगता दिनांक पाच जानेवारी रोजी होणार असून सकाळी 11 ते 9 काल्याचे किर्तन श्री ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे होणार आहे त्यानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे तेव्हा या धार्मिक कार्यक्रमाचा वसमत शहरासह ग्रामीण भागातील भाविक भक्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे डॉ. यम आर केतन वार यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

CLICK TO SHARE