दोन तालु्यातील वाहतुकीला मार्ग झाले सुखकर :-खासदार अशोक नेते

अन्य

बाम्हणी धानोली रस्ता बांधकामाचे भूमिपूजन.

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)

आमगाव:-खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद बांधकाम विभाग गोंदिया यांच्या विकास निधि अंतर्गत आमगाव सालेकसा तालुक्यातील रेल्वे मार्ग वळणावरील रस्ता बांधकाम भूमिपूजन खासदार नेते यांच्या हस्ते करण्यात आले. दोन तालुका सीमा रस्ता हा वाहतुकीला अडसर ठरला होता . अनेक वर्षापासुन रस्ता बांधकाम मागणी करून सदर मार्ग निर्माण मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.जनतेची अनेक दिवसापासून रस्त्यांची मागणी असून सुद्धा दुराअवस्थेमुळे व खराब रस्त्यांमुळे अनेकदा अपघाताना नागरिकांना समोर व्हावे लागत असे,याकडे खासदार अशोक नेते यांनी पाठपुरावा करून बाम्हणी धानोली रस्ता बांधकामाचे २५ लक्ष रूपये निधी मंजूर करून या विकास कामाला प्राधान्य दिले. सदर बाम्हणी धानोली रस्ता बांधकाम भूमिपूजन सोहळा दिनांक २ जानेवारीला आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी खा.अशोक नेते यांनी सदर रस्ता बांधकाम होत असल्याने दोन तालुक्यातील प्रवास हा सुखकर होनार आहे. सदर मार्ग लवकर तयार व्हावे यासाठी संबंधित विभागाने कार्य प्रगतिशील करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सालेकसा तथा पंचायत समिती सदस्य गुमानसिंग उपराडे,भाजपा आमगांव तालुकाध्यक्ष राजूभाऊ पटले, पं. स .सदस्या अर्चनाताई मडावी, तालुका प्रभारी परसराम फुंडे, उपविभागीय अभियंता रवींद्र दमाये,शाखा अभियंता अमित परबत,ता.उपाध्यक्ष विक्की भाटिया,युवा भाजपा नेते यशवंत मानकर,ता. महामंत्री मनोज बोपचे,ता.महामंत्री रामदास हतीमारे, संचालक कृ.उ.बा.स. हुकुम बोहरे,पोलिस पाटील शिलाबाई रहिले,माजी सरपंच रतन टेंभरे,माजी सरपंच भरत पटले,माजी सरपंच धनराज थेर,उपसरपंच उषाताई राऊत, कृष्णाकुमार कुरंजेकर,बलदेव चौधरी, विजय जैतकार,विकास महरवाडे, हितेश डोंगरे तसेच कार्यकर्ते व मोठया संख्येने गावातील नागरिक बंधू आणि भगिनीं उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष राजू पटले यांनी केले.

CLICK TO SHARE