पोंभूण्यात अजूनही सुरूच आहे सुगंधीत तंबाखूचा गोरखधंदा

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

शहरातील एक मोठा तस्कर अवैध सुगंधीत तंबाखूची विक्री पोंभूर्णा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातही बिनधास्तपणे करीत आहे. पोंभूर्णातील तस्कराकडून रोज मध्यरात्रीनंतर अवैध सुगंधीत तंबाखूची वाहतूक केली जाते. यासाठी कार, मारोती व्हॅन, पिक अप चा वापर केला जातो. चोरटी वाहतूकीसाठी घाटकुळ व हरणघाट मार्गाचा वापर करण्यात येत आहे. हा गोरखधंदा पोंभूर्णात मागील पाच वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. आता तर संबंधित तस्कराने मुल तालुक्यातील एका गावातही त्याने आपला गोडाऊन थाटला आहे.

CLICK TO SHARE