प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील मौजा इटोली येथे मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने गावातील नागरीकांना मानव वन्यप्राणी संघर्ष टाळण्याकरीता चित्रफीतव्दारे जनजागृती करणे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यात गावातील नागरीकांनी शेतात कामे करतांना घ्यावयाची काळजी, गुरांचे वन्यप्राण्यापासुन बचाव करणे व वन्यप्राणी वावर वनातील क्षेत्रात प्रवेश करु नये याबाबत चित्रफीत व्दारे गावात जनजागृती करण्यात आली.