महाराष्ट्र 5 सुवर्ण पदकासह आघाडीवर

खेल

विशेष प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत 28 व 29 डिसेंबर या पहिल्या दोन दिवसाच्या खेळात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण पदक, दोन रौप्य व दोन कास्य असे एकूण नऊ पदकांची कमाई करत पदक तालिकेत आघाडी घेतली आहे. तर केरळचे खेळाडू चार सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य असे एकूण 12 पदकासह दुसऱ्या स्थानावर आणि हरियाना 3 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कास्य पदकासह तीसऱ्या स्थानावर आहेत.

CLICK TO SHARE