भाजपा महिला मोर्चाचे वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती साजरी

अन्य

प्रतिनिधी:करीम खान हिंगणघाट

हिंगणघाट दि.३ डिसेंबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भाजपा महिला मोर्चाचे वतीने आ.समिर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत महिला मोर्चाच्या सर्व सदस्या व पदाधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्मृतीस अभिवादन केले. कार्यक्रमाचा समारोप भाजपा महीला मोर्चाचे महिला सदस्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या स्मृती जागवित घोषणा देऊन केला. सदर कार्यक्रमाचे वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष छाया सातपुते, शहर अध्यक्षा महिला मोर्चा रवीला आखाडे, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री अनिता मावळे, महिला मोर्चा सरचिटणीस शारदा पटेल,प्रसिद्धी प्रमुख सहसंयोजिका सरीता देशपांडे, विधानसभा प्रमुख नलिनी सयाम,संपर्कप्रमुख महिला मोर्चा कल्याणी इटनकर, ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा कीर्ती सायंकार इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अर्चनाताई एटीवार , मंगलाताई घोडमारे, वैशालीताई उरकुडकर,

पद्माताई कोडापे,शितलताई खंदार, रजनी सावळे,सुषमाताई शुक्ला,मनीषाताई देशकर,जयश्रीताई गळगटे,वृषालीताई अंबळकर,सिद्धी देशपांडे,धनश्री क्षीरसागर इत्यादी महिला मोर्चाच्या सदस्या उपस्थित होत्या.

CLICK TO SHARE