ऐतिहासिक विजासन टेकडीवर बुध्दमुर्तीची स्थापना

अन्य

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

भद्रावती येथील ऐतिहासिक बुध्द लेणी टेकडीवरील बुद्ध मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांनी शहर बंद करत मोर्चाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर काल मंगळवारी दुपारी ऐतिहासिक बुध्द लेणी टेकडीवर वंदनिय भिक्खू संघाद्वारे धम्म विधीनुसार नवीन ६ फुट उंच बुद्ध मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

CLICK TO SHARE