बाजार समितीची दिनदर्शिका आगीत फेकली

अन्य

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

गोंडपिपरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तेवर असलेल्या भाजपने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचा मुद्दा तापलेलाच आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 2) बाजार समितीच्या या दिनदर्शिकांची होळी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी बाजार समितीच्या स्थापनेनंतर येथे पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. अशात बाजार समितीत सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. बाजार समितीने नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. ही दिनदर्शिका प्रकाशित होताच काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला.

CLICK TO SHARE