पोवनीच्या कोळसा खाणीला ठोकले सील

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

ग्रामपंचायतीच्या कराचा १४ कोटी ८८ लाख रुपयांचा भरणा न केल्याने राजुरा पंचायती समितीने वेकोलि बल्लारपूर अंतर्गत येत असलेल्या पोवनी खाण क्रमांक २ आणि ३ ला मंगळवारी सील ठोकले. वेकोलि बल्लारपूर अंतर्गत पोवनी खदान २ आणि ३ यांनी २०१६ पासून साखरी ग्रामपंचायतीचा १४ कोटी ८८ लाख रुपये कर थकीत ठेवला आहे. कराचा भरणा करावा, यासाठी पंचायत समिती राजुराचे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी वेकोलिला नोटीस बजावली.

CLICK TO SHARE