प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन १ जानेवारी २०२४ पासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु होणार आहे. यापुढे पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येणार असल्याने अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण येणार आहे. चंद्रपूर शहरास ईरई नदी व धरणावरून पाण्याची उचल करून, रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची गरज पाहता सध्या ४५ दशलक्ष लिटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज करण्यात येते.