प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर-आज दिनांक 03 जानेवारी 2023 रोजी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती शहरातील PWD गेस्ट हाऊस मध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिसूर्य म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यकर्माचे संचालन संघठन मंत्री रोहित जंगमवार यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्रवक्ता आसिफ हुसेन शेख यांनी मांडली. सहकार विभाग प्रमुख अजयपाल सुर्यवंशी सर, भोगे काकू यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षाविषयी भाषणात माहिती दिली त्यानंतर शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांचे अध्यक्षीय भाषण झाले व कार्यक्रमाची सांगता उपाध्यक्ष गणेश सिलगमवार यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.