क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत.

अन्य

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देत त्यांना शिक्षित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज माळी समाजाच्य वतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शोभायात्रेत सहभागी समाजबांधवांचे स्वागत करत फळ वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे, युवा नेते अमोल शेंडे, शहर संघटक संजय निकोडे, यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना हातागावकर,अल्पसंख्यांक युवा आघाडीचे शहर अध्यक्ष, राशेद हुसैन, शहर संघटिका सविता दंडारे, नकुल वासमवार, सुरेंद्र अंचल, देवा कुंटा, सतनाम मिर्धा, ताहीर हुसैन, कार्तिक बोरेवार, शंकर दंतुलवार, आशा देशमुख, शांता धांडे, अनिता झाडे, वंदना हजारे, वैशाली मद्दीवार, माधुरी बावणे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पुरुष, महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..

CLICK TO SHARE