चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उदघाटन

खेल

प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उदघाटन समारंभाला उपस्थित राहून अतिशय आनंद झाला. हा महोत्सव 3 ते 7 जानेवारी पर्यंत असून यामध्ये पशु प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, वन शेती, बांबू शेती व चर्चा सत्र अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला हा हैद्राबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा येथून येतो त्यामुळे कापूस उत्पादन संशोधन केंद्राप्रमाणेच भाजीपाला संशोधन केंद्र जिल्ह्यात असावे म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एका क्षणात त्यांनी ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता दिली.

CLICK TO SHARE