प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर
ट्रक चालकांचा संप सुरू झाल्याने पेट्रोल मिळणार नाही, या धास्तीने नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी उसळत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी बुधवारी इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम परिवहन विभाग व पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून आढावा घेतला. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विविध विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.