प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर
इरई नदी ही शहराला समांतर सात किलोमीटर वाहते. २०१३, २०२० व २०२२ मध्ये इरई नदीला पूर आला होता. पूर व धरणाचे सर्व गेट उघडल्यानंतरही काही भागात २० वर्षांत कधीही पाणी पोहोचले नाही, असा एम. आर. सॅकचा अहवाल आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री व जुजबी सर्व्हेचा आधार घेतला तर शहराचे नुकसान होईल. अवैध बांधकामे वाढतील. त्यामुळे संबंधित यंत्रणेने पुन्हा एकदा वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करावे, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.