सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.एस.आर.के.इंडो पब्लिक स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन

अन्य

विद्यार्थ्यानी टाकला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश.

प्रातीनिधी:साजिद पठाण नागपूर

जलालखेडा (त.4) एस. आर. के. इंडो पब्लिक स्कूल जलालखेडा यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य शुभांगी अर्डक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यारपण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला प्राचार्य शुभांगी अर्डक, कविता शुक्ला, हेमलता गोरे,नीलिमा इंगोले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.फोटो ओळी. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना शाळेतील शिक्षक.

CLICK TO SHARE