आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन कामाला

अन्य

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे मागासलेपण तपासण्यासाठी आता चंद्रपूर जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या या सर्वेक्षणासाठी प्रगणक नेमणूक व प्रशिक्षण, सुरक्षा पुरविणे आदींबाबत गावनिहाय नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने गुरुवारी (दि. ४) विविध विभागांची बैठक घेऊन कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी १५० प्रश्नांची प्रश्नावलीही तयार करण्यात आली आहे.

CLICK TO SHARE