नागरिकांना सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन

अन्य वायरल सोशल

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

गडचांदूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन येथे शहरातील जेष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्या बाबत मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गडचांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन केले त्यानी मोबाईल वापर करीत असताना आणि ऑनलाईन पेमेन्ट करतांना जपून वापर करावा व अनेक अनोळखी लोक फोन करून तुमची फसवणूक करू शकतात त्यावेळी सर्वांनी जागृत असणे महत्त्वाचे आहे व आपल्या मोबाइलचा गैरवापर होऊ शकतो व इतरही महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

CLICK TO SHARE