प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ
संजयभाऊ धोटे माजी आमदार राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली सव्यसाची डे महाव्यवस्थापक WCL बल्लारपूर, प्रदेश भाजपा कामगार मोर्चा उपाध्यक्ष अजय दुबे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, तालुका सरचिटणीस रावला रामास्वामी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.हर्षा, जीएमएल, चड्डा, साई कृपा ट्रान्सपोर्ट इत्यादी डब्ल्यूसीएल बल्लारपूरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना घेणे, नियमानुसार व वेळेवर पगार देणे, पीएफ भरणे, प्रदूषण दूर करणे आदी मुद्द्यांचा या निवेदनात समावेश होता. महाव्यवस्थापकांनी 15 ते 20 जानेवारी दरम्यान सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रावला कुमार, राजकुमार भोगा, दिलीप ठेंगणे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.