बल्लारपुरात रविवारी रोगनिदान शिबिर

सोशल

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर येथील जुने बस स्थानकाजवळील गांधी विद्यालय परिसरात ७ जानेवारीला निःशुल्क रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात ६० तज्ज्ञ डॉक्टर तसेच १२० वैद्यकीय कर्मचारी रुग्णांना सेवा देणार आहेत.

CLICK TO SHARE