वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर

बल्लारपूर येथून जवळच असलेल्या कारवा जंगलात वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून ठार केले. ही घटना, रविवार 7 जानेवारी रोजी घडली. या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. ज्यात वाघाने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. 2023 मध्ये संपूर्ण वर्षभरात 21 जण वाघांचे बळी ठरले. बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा 1 मधील राखीव वनखंड क्रमांक 492 मध्ये आज रविवारी बल्लारपूरच्या राजेंद्रप्रसाद वॉर्डातील रहिवासी 63 वर्षीय शामराव रामचंद्र तिडसुरवार यांना वाघाने भक्ष्य बनवले.

CLICK TO SHARE